जळगावः महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. संजय पवार यांनी पुन्हा जिल्हयात सहकारात वर्चस्व सिध्द केले आहे. संजय पवार हे दुसऱ्यांदा पणन महासंघावर प्रतिनिधीत्व करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.६ जून शेवटचा दिवस होता. महाराष्ट्र
राज्यातून १७ संचालकांची निवड होत असते त्यात सहकारी खरेदी विक्री संघ व सहकारी जिनींग फॅक्टरी मतदारसंघ (प्रत्येक विभागातून एक संचालक) असे अकरा संचालकांची निवड होत असते. त्यात नाशिक विभागातून संजय पवार यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामार्तेब झाला आहे. सहकारातील मात्तबर नेते म्हणून संजय पवार यांची ओळख असून जिल्हयात राजकीय स्थिती फार वेगळी असतांना देखील बिनविरोध निवड होणे सोपे नव्हते असे असतांना सहकारातील राजकीय जादू चालवून पवार यांची निवड झाली आहे.