जळगाव;- क्रीडा व युवक संचलनालयातर्फे नुकत्याच सोलापूर येथे तीन ते सहा डिसेंबर या तारखेला आयोजित करण्यात आलेल्या शासकीय राज्यस्तरीय सेपक टकारा क्रीडा स्पर्धेत एम. ए. आर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या व ज्युनियर कॉलेजच्या 19 वर्षाआतील संघाने प्रथम क्रमांक पटकाविले व सैय्यद शिकेब इमरान आणि शेख फैजान राईस राष्ट्रीय स्तरासाठी यांची निवड करण्यात आली तर 17 वर्षाआतील हम्माद शकील बागवान याची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली.
यात 19 वर्षाआतील फैझान शेख, सैय्यद शिकेब, मोहम्मद उमर, फुरकान शेख, अदनान बागवान यांचा समावेश आहे, या विद्यार्थ्यांना जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते मेडल व बुके देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेचे व सेपक टकारा संघटनेचे अध्यक्ष एजाज मलिक सैय्यद चांद, सचिव शेख अमीन बादलीवाला, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, इकबाल मिर्झा, सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, प्राचार्य डॉ. बाबू शेख उपप्रचार्य एस. एम. फारुख, नईम बशीर यांनी कौतुक केले.
या विद्यार्थ्यांना प्रा. वसीम मिर्झा, शहेबाज शेख, आसिफ मिर्झा, मुजफ्फर शेख, आमिर खान, फैजान शेख, इमरान शेख, यांचे मार्गदर्शन लाभले.