जळगावः शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध होणार आहे. १० डिसेंबर २३ ते १५ जानेवारी २४ पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील भव्य कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधता येईल. कृषीक्षेत्रातील जगात जे नव्याने तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिके जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली आहेत.
हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात गादीवाफ्यावर ठिबक संच बसवून एक डोळा
पद्धतीने ऊसाची लागवड. क्रॉप कव्हरसह क्रॉपकुलिंग यंत्रणा तापमान वाढीवर नियंत्रणासाठी मिस्टर स्प्रिंकलर यंत्रणा, कापूस पिकात ठिबक मल्चिग आणि गादीवाफाचा त्रिवेणी संगम, आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, मोसंबी, संत्रा या फळझाडांची अतिसघन पद्धतीने गादीवाफ्यावर ठिबक संचावरती केलेली लागवड बघता येईल.. हवामान बदलांच्या संकटावरील उपाय म्हणून शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणात बागांची शेती किती गरजेची आहे हे अनुभवता येईल. जैन हिल्सवर शेडनेट व इनसेक्टरनेटमध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा यांची केलेली लागवड पाहायला मिळेल.