जळगांवधार्मिक

धक्कादायक : ख्रिश्चन धर्म प्रचारकांकडून हिंदू धर्माचा अप्रचार, चौघांविरुद्ध गुन्हा

खान्देश टाईम्स न्यूज । २ जुलै २०२३ । जळगावात रविवारी पोलीस आणि हिंदू संघटनांनी एक मोठे प्रकरण उजेडात आणले आहे. भगवान येशूची प्रार्थना केली नाही तर तुमचे वाईट होईल, तुम्ही ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा तुमचे सर्व आजार दूर होतील असे प्रवचनाच्या माध्यमातून सांगत भोळ्या आणि अशिक्षीत लोकांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश करण्यास सांगणा-या चौघा ख्रिश्चन धर्म प्रचारकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किर्तनकार योगेश कोळी यांना चुलत भावाच्या वाढदिवसानिमीत्त हॉल हवा असल्याने ते महामार्गावरील मंगलमहॉल बघण्यास आले होते. पाहणी करताना त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि हिंदू धर्माचा अपप्रचार सुरु असल्याचे दिसून आले. केवळ ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यानंतरच तुमचे विकार नाहीसे होतील असा प्रचार या ठिकाणी सुरु असल्याचे दिसून आले.

जमलेल्या भोळ्या आणि अशिक्षीत लोकांना धर्म बदल करण्याची इच्छा नव्हती. जळगाव भुसावळ महामार्गावरील मंगलम लॉन येथील हॉलमधे जमलेल्या सुमारे तिस ते चाळीस जणांसमोर प्रवचनाच्या माध्यमातून हा प्रचार सुरु असल्याचे लक्षात आले. हिंदू धर्माबाबत अपप्रचार सुरु असल्याचे बघून किर्तनकार तथा कथाकार योगेश कोळी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

सिना संतोष पाटील (रा. कोल्हे हिल्स जाणता राजा शाळेजवळ जळगाव मुळ रा. केरळ), पवन दिपक सारसर (रा. मण्यारखेडा), राजकुमार हरिशंकर यादव (रा. खेडी मुळ रा. उत्तर प्रदेश), प्रदीप बाजीराव भालेराव (रा. वाघनगर जळगाव) अशा चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण पाटील करीत आहे. गुन्ह्यात तीन पुरुष आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button