चोपडा ;– शहरातील सुंदरगढी झोपडपट्टी भागातील रहिवासी असलेले मोहन उर्फ सुरेश सोमनाथ महाजन (वय ४९) यांनी सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहयोग कॉलनीमधील भाडे कराराने घेतलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश महाजन हे कांदे बटाटे विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलले नसून तपास पोहेकॉ शेषराव तोरे करीत आहेत.