खान्देशजळगांव

स्वतःसाठी , रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक – डॉ. गिरीश ठाकूर

जळगाव ;- स्वतःच्या व रुग्णांच्या आरोग्यमयी भविष्यासाठी डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव मूल्यवान आहे. त्यासाठी मानवी मूल्य महत्वाचे ठरतात. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासकाने तयार राहिले पाहिजे. विद्यार्थी स्वतः आत्मविश्वासाने कौशल्यपूर्ण, ज्ञानपूर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात निपूण होऊ शकतो, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “संसर्गजन्य रोग” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निरीक्षक डॉ. सुरेंद्र सुरवाडे, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. गजानन सुरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. विलास मालकर, कार्यशाळा आयोजक सचिव डॉ. किशोर इंगोले मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रस्तावनेतून, कार्यशाळा घेण्यामागील उद्देश डॉ. किशोर इंगोले यांनी स्पष्ट केला. विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. संसर्गजन्य आजारांमधील सूक्ष्मजीवशास्त्र, विकृतिशास्त्र जाणून घेणे महत्वाचे आहे, असे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले. सूत्रसंचालन करून आभार महाविद्यालय प्रतिनिधी राजसिंग छाबरा यांनी मानले.

कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात टायफॉइड (आतड्यांचा ताप) या विषयी डॉ. विजय गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. क्लिनिकल प्रॅक्टिसमधील नीतिमत्ता याबाबत डॉ. सुरेखा चव्हाण, मलेरियाविषयी डॉ. विलास मालकर, इन्फ्लुएंझावर डॉ. किशोर इंगोले तर डेंग्यूविषयी डॉ. सुखदा बुवा मोरे यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. टीबी (क्षयरोग) आजारवर विद्यार्थ्यांत चर्चा घडवून आणण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. मारुती पोटे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button