जळगाव ;– गेल्या काही महिन्यांन पूर्वी एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथील कै.य.ब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालगृहातील झालेल्या अत्याचार प्रकरणी बालगृहातील अल्पवयीन पाच मुलींवर तेथील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलींनी जळगाव बालकल्याण समिती कडे तक्रार करूनही त्याची दखल न घेता दिरंगाई केल्या प्रकरणी समिती बरखास्त करून नवीन समिती नेमण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ह्या घटनेवर समाज माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर ताशेरे ओढले गेले अनेक पक्ष संघटना ह्यांनी वेळोवेळी आंदोलन केली निवेदन दिली , तरीही या संताप जनक घटनेवर अजूनसुद्धा त्यावर कार्यवाही झालेली नाही . एकीकडे त्यांच्या वर गुन्हे देखील दाखल झाले असून ह्या परिस्थिती मध्ये देखील बालकल्याण समिती अजून ही बरखास्त झालेली नाही हा प्रकार न्यायव्यवस्थेवरील व प्रशासनावरील समाजाचा विश्वास कमी करणारा आहे..
याच पार्श्वभूमीवर मनविसे कडून निवेदन देण्यात आले . पुढील ५ दिवसात जर समिती बारखास्थीचे आदेश न झाल्यास मनविसे रस्ता रोको करून मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष कुणाल पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निवेदनातून दिला आहे.