जळगाव ;- पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ८६ व्या जन्मदिन जयंती निमित्त पासिंग वॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात नूतन मराठा महाविद्यालयातील व्हॉलीबॉल व बास्केटबॉल च्या खेळाडूंनी एकत्रित येऊन जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक यांच्या ८६ व्या जन्म जयंती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
सर्वप्रथम फारुक शेख यांनी डॉक्टर भवरलाल जैन यांच्या जन्म जयंती निमित्त त्यांच्या नेतृत्वात औद्योगिक क्षेत्रासोबतच कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात जळगावची कशी वाढ झाली हे त्यांनी त्यांच्या २७ वर्षाच्या अनुभवातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी के पी पलोड हायस्कूलच्या मंजुषा भिडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, बास्केटबॉल चे आंतरराष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक वाल्मीक पाटील, बीएसएनएलचे ठेकेदार सुभाष पवार ,पोलीस दलाचे भाऊसाहेब पाटील यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली.
यावेळी सोनल हटकर,प्रतीक्षा सोनवणे,कृष्णा हटकर मयूर सोनवणे,पूर्वा हटकर तुषार बेंडवाल,हिमांशू बागुल नयन पाटील,कुणाल पांडे मैथिली पौनीकर, देवेश पाटील,रणवीर श्रावणे रोनक दहाड, अझीजुर रहमान, तन्वी संदानशिवे रीत जोशी,देवशेकर सोनार.*व्हॉलीबॉल चे खेळाडू*श्री दर्शन आटोळे, क्षितिज सोनवणे, गौरव जावळे, करण पाटील ,एजाज खान, हर्षल मिस्त्री, भावेश शिंदे, कृष्णा पवार, कृपा बाविस्कर, निकिता धांडे , कुणाल जैन , हिमांशी अहिराणी, ईशा सूर्यवंशी, तन्वी गायकवाड, देविका नेवे, आदींची उपस्थिती होती