31 december पार्टी होणार रद्द सरकारने जाहीर केला मोठा निर्णय

मुंबई : ओमायक्रॉन व कोरोनाच्या नववर्षाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीच्या निमित्ताने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसाठी राज्याच्या गृह विभागाने बुधवारी मार्गदर्शक अश्या सूचना जारी केल्या . नववर्षाच्या स्वागताकरीता नागरिकांनी घराबाहेर पडू नये व नववर्षाचे स्वागत हे शक्यतो घरीच साधेपणाने करावे , असे सांगितले आहे त्यात राज्य सरकारने या आधीच रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी देखील लागू केली आहे .

ती कायमच असेल . ३१ डिसेंबर व १ जानेवारीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहांमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत , त्याचबरोबर खुल्या जागेमध्ये उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित असेल, तसेच सामाजिक अंतराचे देखील पालन करावे लागेल . मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि ३ हजार ९०० वर पोहोचली आहे . मागील २४ तासात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झालेली दिसत आहे .

मुंबईत मंगळवा १ हजार ३७७ इतके नवे रुग्ण आढळले होते , बुधवारी मुंबईत २ हजार ५१० रुग्ण आढळले आहेत व त्यामुळे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.