जळगाव :- कुटी पेटून आग लागल्यामुळे जळगाव एमआयडीसीतील सेक्टर ए-97 येथील सोमनाथ इंटरप्रायजेस या कंपनीत १२ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारासलागल्याची घटना घडली असून 13 बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत 1लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव एमआयडीसी परीरातील सेक्टर ए-97 मध्ये असलेल्या सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामामध्ये मंगळवार १२ रोजी डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लागून या गोदामातील 15 ते 20 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत हिटर बनविण्यासाठी लागणारे कोईल ५० ते ६० बंडल ,१३० बॉक्स सिरॅमिक ,लॅपटॉप,१० एचपीचे स्पॉट वेल्डिंग मशीन,२ हॅन्ड ग्राइंडर फायबर ग्लास वायर ८ बंडल ,हॅन्ड तुळस व इतर साहित्याचे आगीत नुकसान झाल्याची फिर्याद महेश वामन भावसार वय ४० यांनी दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.