जळगाव – गोवा राज्यातील पणजी येथे ९ व १० डिसेंबर रोजी पार पडलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी व्हेनेरोलॉजी अॅण्ड लेप्रोरोलॉजीतर्फे आयोजित क्युटीकॉन गोवा २०२३ या सातव्या राज्यस्तरीय सोहळ्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील त्वचाविकार विभागाच्या डॉ.सागरिका ढवण यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
राज्यस्तरीय क्युटीकॉन कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रासह गोव्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवरील पोस्टर्सचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.सागरिका यांचाही समावेश होता. त्यांना त्वचाविकार विभागाचे प्रमुख डॉ.निलेश भिरुड, डॉ.शुभा महाजन, डॉ.पंकज तळेले यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.सागरिका यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ.एन.एस.आर्विकर, अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी अभिनंदन केले. यावेळी डॉ.पंकज तळेले, डॉ.दिनेश कुलाळ, डॉ.अभिलेष, डॉ.चेतना, डॉ.तेजस्विनी आदि उपस्थीत होते.