देश-विदेश

अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका

मुंबई :-अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आली आणि प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकली. हा हा करता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ४७ वर्षीय श्रेयस तळपदे याला शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.

मुंबईत शूटिंग संपल्यानंतर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं आणि बेशुद्ध झाला. त्यामुळे जवळ असलेल्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. श्रेयसला हृदयविकाराचा झटका होता असं रुग्णालयात दाखल केल्यानंतर केलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता.

एका सू्त्रांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, “त्याने पूर्ण दिवस शूटिंग केली. तो एकदम व्यवस्थित होता. त्याने अॅक्शन सीनही शूट केला होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी गेला आणि पत्नीला सांगितलं अस्वस्थ वाटत आहे. अशात पत्नीने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. इतकंच काय तर रुग्णालयात नेताना बेशुद्धही झाला.”

श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत करत होता. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, आर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीवर, राजपाल यादव, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, परे रावल, तुषार कपूर, मीका सिंह आणि दलेर मेहंदी असे स्टार कलाकार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 ला रिलीज होणार आहे. त्यासाठी आतापासून शूटिंग सुरु झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button