पारोळा ;– बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची ३९ हजार रुपयांची मंगल पोत अज्ञात चोरट्याने १४ रोजी लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नाशिक येथे राहणाऱ्या कलाबाई रामदास बागुल वय ७५ या १४ रोजी दुपारी डिड वाजेच्या सुमारास गावाला जाण्यासाठी पारोळा बसस्टँड वर आल्या असता त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटयांनी त्यांची ३९ हजार रुपयांची मणी मंगळसूत्र लांबवीले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कला बाई यांनी पारोळा पोलिसांत धाव घेत फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजय पायावर करीत आहे.