मुक्ताईनगर ;- कारमधून गुटख्याची सुरू असलेली वाहतूक मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येत असताना पोलिसांनी कारवाई करून या कारवाईत ३ लाख ९ हजारांचा गुटखा व कार मिळून एकूण ८ लाख २९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाली.
हवालदार विनोद सोनवणे यांना कारमधून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कार (क्रं.एमपी.६८-झेडए.९ ८६२) ला मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात पकडून तपासणी करण्यात आली. त्यात गुटखा आढळला. शेख अबिद शेख जहीर (वय ३०, रा. राजघाट, काली मशिदजवळ, बऱ्हाणपूर) याला अटक केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.