इतर

मुक्ताईनगरात भीषण अपघात: मद्यधुंद डंपरचालकाने दुचाकीला चिरडले; पती-पत्नी आणि मुलगी ठार

मुक्ताईनगरात भीषण अपघात: मद्यधुंद डंपरचालकाने दुचाकीला चिरडले; पती-पत्नी आणि मुलगी ठार
मुक्ताईनगर: तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक देत सुमारे ५० ते ६० फूट फरफटत नेल्याने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर सात-आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. संतप्त जमावाने डंपर पेटवून दिले, तर पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थे सुरू असलेले इंदोर हैदराबाद महामार्गाचे काम हे बी एन अग्रवाल ही कंपनी करत आहे या कंपनीचे मुरूम भरलेले डंपर एम एच 19 सी एक्स 2038 रस्त्याने जात असताना या डंपर ने दुचाकी वर असलेले पती-पत्नी नितेश जगतसिंग चव्हाण वय 32, सुनिता नितेश चव्हाण वय 25, शिव नितेश चव्हाण वय 7 वर्ष सर्व राहणार मातापुर तालुका डोईफोडा जिल्हा बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) या तिघांचा डंपरच्या टायराखाली आल्याने जागीच मृत्यू झाला तर नेहाल सिंग नितेश सिंग चव्हाण वय 11 वर्ष हा जखमी पासून याला पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे. हे कुटुंबीय दुचाकीने दोघे मुल आणि पती-पत्नी इच्छापुर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते ते कामानिमित्त जळगाव येथे वास्तव्यास आहे. परंतु इच्छापुर येथे जाण्याआधी पूर्णाड फाट्यावर अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. यावेळी घटनास्थळी संतप्त जमावाने बी एन अग्रवाल कंपनीचे चालक हे मद्यपान करून नेहमी वाहने चालवत असतात असा आरोप करीत वाहनाची तोडफोड करत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. उशिरापर्यंत तिघेही मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी होते. पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button