पाचोरा ;– तालुक्यातील गोराडखेडा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना सर्पाचे चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारच्या घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, मोतीराम महारु पाटील (वय – ३६) रा. गोराडखेडा ता. पाचोरा हे १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असतांना मोतीराम पाटील यांना विषारी जातीच्या सर्पाचे चावा घेतला. सदरचा प्रकार मोतीराम पाटील यांचे पुतणे गोपाल हिलाल पाटील यांच्या लक्षात येताच मोतीराम पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तेली यांनी मोतीराम पाटील यांना मृत घोषित केले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहे. अत्यंत होतकरु व शांत स्वभावाचे मोतीराम पाटील हे शेती करुन व नुकताच त्यांनी पाचोरा येथे चहाचा व्यवसाय सुरू केला होता. मोतीलाल पाटील यांचे पाश्चात्य आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन मोतीराम पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने गोराडखेडा व परिसरात शोककळा पसरली आहे.