जळगाव;- ‘गुरुपोर्णिमा – व्यासपूजा’ निमित्ताने मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये ‘गुरुतत्त्व महात्म्य’ याविषयी ऋषिकेश, देहरादून येथील जीवन मोक्ष योग गुरुकुल चे संस्थापक आचार्य विनय कौशिक यांनी मार्गदर्शन केले. आचार्य विनय यांनी गुरुचे आपल्या जीवनातील महत्व, गुरु दीक्षा घेण्याची आवश्यकता, योग साधनेमधील गुरुचे महत्व, इत्यादी विषयावर अनेक दाखले देवून प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरवात ओंकार प्रार्थना आणि गुरुवंदनेने करण्यात आली आणि शेवट शांतीपाठाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीतांजली भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार सोहम योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी व्यक्त केले. योगशिक्षक पदविका, एम. ए. योगिक सायन्स, बी. ए योगिक सायन्स, नॅचरोपॅथी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आणि योगप्रेमी साधकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच सोहम योग अँड नॅचरोपॅथीच्या सर्व प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.