
अमळनेरजवळ रेल्वे रुळांमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला
अमळनेर : तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील भूषण भगवान जाधव (वय २५) या तरुणाचा मृतदेह भोरटेक ते अमळनेर दरम्यान रेल्वे रुळांमध्ये आढळून आला. ही घटना बुधवार, ७ मे रोजी दुपारी १.३० वाजता उघडकीस आली.
या संदर्भात केदारसिंग जाधव यांनी मारवड पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करत आहेत. मृतदेह पाहणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.