
जळगाव l ०३ जुलै २०२३ l भडगाव प्रतिनिधी l समाज सेवा व जनसेवा हीच ईश्वर सेवा असून आज गुरुपौर्णिमा चे औचित्य साधत आदर्श कन्या विद्यालय व वस्तीगृह भडगाव येथील गरजू विद्यार्थिनीना शालेय आवश्यक वस्तु शिवशाही प्रतिष्ठान यांच्या तर्फे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अगणित होता. यावेळी आदर्श कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे सर शिक्षक वृंद व हॉस्टेल स्टॉप उपस्थित होते. यांनी सर्व शिवशाही प्रतिष्ठान चे पदाधिकारी यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व शिवशाही प्रतिष्ठान चे निःस्वार्थ कार्याचे कौतुक ही केले. यावेळी
शिवशाही प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष निलेश पाटील, विनोद जुलाल पाटील,सौरभ पाटील, डॉ.पुष्कराज पाटील, डॉ. प्रकाश बच्छाव, तेजस पाटील, साजन पाटील, मयूर पाटील, सागर वाघ, मनोज अहिरराव, डॉ. निखिल पाटील, मयूर बापूराव पाटील उपस्थित होते.