जळगाव ;- जगात विविध कलेचा उद्गमा मुळे मानवी जीवन सुखद होण्याबरोबर गतिमान झाले आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय कामास गतिमानता देण्यात स्टेनाग्राफी कलेचे महत्व उल्लेखनिय आहे. सर आयझॅक पिटमन यांनी या कलेचा शोध लावून जागतिक पातळीबरोबर भाषिक प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी मोलाची भर टाकली आहे. त्यानिमित्ताने शॉर्टहँडचे प्रणेते सर आयझॅक पिटमन यांची जयंती गांधी उद्यानात साजरी करण्यात आली
|
प्रशासनातील कणा – स्टेनोग्राफर :
शॉर्टहँडचे प्रणेते सर आयझॅक पिटमन यांची जयंती स्टेनोग्राफर दिवस म्हणून साजरी करण्यात येते. त्या निमित्ताने जळगाव येथे गांधी उद्यानात विविध विभागातील स्टेनोग्राफर्स ंमार्फत स्टेनोग्राफर दिवस साजरा करण्यात आला. . न्यायलये, सरकारी कार्यालये, खाजगी-सहकारी संस्थां, महामंडळे, विद्यापीठे, महाविद्यालय आणि इतर अनेक प्रशासकीय कार्यालयात स्टेनोग्राफर हा महत्वाचा कणा आणि दुवा म्हणून ओळखला जातो. त्यामागे शॉर्टहँडचे जनक सर आयझॅक पिटमन यांनी शोध लावलेल्या स्टेनोग्राफी या कलेची जोड आहे. आज शॉर्टहँडमुळे प्रशासकीय कामकाज गतिमानतेने झाल्याबरोबर लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने एकूणच त्यांच्या जीवनाच्या दिशा आणि दशा बदलण्यास सहाय्य ठरले आहे
विविध विभागातील स्टेनोग्राफर्सची आदरांजली :
जळगाव जिल्हा मोफुसिल स्टेनो असो. :
महाराष्ट्र राज्य मोफुसिल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, नागपूर जिल्हाशाखा जळगाव तर्फे महात्मा गांधी उद्यानात पिटमन जयंती साजरी करण्यात आली.
मा. अप्पर जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक भारत भगत, मा. कुलगुरु महोदयांचे स्विय सहायक राजेश बगे, प्र-कुलगुरु महोदयांचे स्वीय सहायक डॉ. महेंद्र महाजन, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. सोमनाथ वडनेरे, अभ्यास मंडळाचे प्रकाश वसावे यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात आला.
कबचौउमवि, जळगाव :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सर्व स्टेनोग्राफर्स यांच्या वतीने सर आयझॅक पिटमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले गुलाबराव बोरसे, चंद्रकांत नेरपगार, दिपक अलाहित, डॉ. सोमनाथ वडनेरे, डॉ. महेंद्र महाजन, राजेश बगे, महेश पाटील, मिताली देशमुख, चित्रांगा चौधरी रमेश गांगुर्डे उपस्थित होते. जळगाव आदी जिल्ह्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक हजर होते.
सर आयझेक पिटमन – दि. 4 जानेवारी 1813 दिनी ट्रोब्रिज, इंग्लड येथे जन्मलेल्या पिटमन यांनी स्वत:च्या बुध्दीचातुर्याने ध्वनीलेखनाची कला विकसित केली. ध्वनी आणि श्रृती तत्वावर आधारित या कलेत प्रत्येक ध्वनी प्रकार आणि मुद्रण अक्षरास एक सांकेतीक रेखन चिन्ह दिले. स्टेनोग्राफिक साऊंड हँड सन 1837 व फोनोग्राफी 1840 हे दोन ग्रंथ त्यांनी विशेष या कलेसाठी लिहिले. त्यांची कला जगभरात पिटमन स्टेनोग्राफी म्हणून स्विकारली गेली ज्या योगे लाखो स्टेनोग्राफर्स तयार झालेत. सन 1894 मध्ये ब्रिटीश सरकारने त्यांना सर किताब देऊन गौरव केला. 22 जानेवारी 1897 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.