इतरखान्देशगुन्हेजळगांव

सलमान खान यांची ६५ हजारात ऑनलाईन फसवणूक

भुसावळ ;– रेल्वेत नोकरीला असलेल्या सलमान खान नामक तरुणाला क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवून ६५ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सलमान खान कायमखानी (वय-२९) रा.गजानन महाराज नगर भुसावळ येथे राहतात . ते रेल्वे विभागात नोकरीला आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्यांना अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आला.त्यांनी “आम्ही क्रेडिट कार्डच्या बँकेतील कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह म्हणून बोलत असल्याचे सांगत तुमच्या क्रेडिट कार्ड जॉइनिंगचे चार्जेस ९ हजार ९९९ रुपये परत करावयाचे आहे. त्यासाठी एक लिंक पाठवली. त्या लिंकचे स्टेप फॉलो करायला सांगितल्यानुसार सलमान खान यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून स्टेप फालो करत गेले. त्यावेळी अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाइन पद्धतीने २ ट्रान्झेक्शन करून एकूण ६५ हजार ५०९ रुपये किमतीची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केली, परंतु त्याबाबत त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन मोबाईल धारकांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button