इतर
डॉ. नीलाभ रोहन यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

डॉ. नीलाभ रोहन यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती
मुंबई– महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज एक महत्त्वाचा आदेश निर्गमित करत भा.पो.से. अधिकारी नीलभ रोहन यांची दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. नीलाभ रोहन हे सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते. त्यांना आता पुन्हा महाराष्ट्रात आणून या नव्या जबाबदारीवर नियुक्त करण्यात आले आहे. ही पदस्थापना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२न अंतर्गत आणि पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.
हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीसह महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in} व्यंकटेश माधव भट, शासनाचे सह सचिव यांनी काढले आहेत .




