खान्देशजळगांवदेश-विदेश

‘एल-1’ लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला ‘आदित्य’; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी!

श्रीहरीकोटा ;- चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. असून इस्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केलं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची आखणी केली आहे. L1 पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक टक्क्यावर येतं. इस्रोने मागच्यावर्षी 2 सप्टेंबरला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सोलर ऑब्जर्वेटरीला सूर्याच्या दिशेने पाठवलेलं. हि भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच आहे.

इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. “अगदी जटिल असं स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन.. मी आणि संपूर्ण देश आज या वैज्ञानिकांचं कौतुक करत आहे.” अशा आशयाची पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवरून केली आहे.

आदित्य यानाने देखील इस्रोला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचल्याचं सांगितलं आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. “एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे. आपण सूर्याची गुपिते आता उघड करणार आहोत” अशा आशयाची पोस्ट इस्रोच्या आदित्य एल-1 या एक्स हँडलवरुन करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button