खान्देशजळगांव

यावल अभयारण्यात ‘टायगर अभी जिंदा है’ !, पट्टेदार वाघ कॅमेऱ्यात कैद

जळगाव ;- यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाची छबी उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच अभयारण्याचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया वन्यजीव विभागासह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.आहे. यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये काल ६ रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी  लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. .

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती. मात्र, अनेकांनी यावल अभयारण्यातील जैवविविधता टिकून राहावी, यासाठी शक्य ते प्रयत्न केले आहेत. यावल अभयारण्यात अजूनही जंगलाचा राजा रुबाबात वावरत असल्यावर शिक्कामोर्तब करून गेला आहे.

मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला होता.आता हा वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे कि मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती जमीर शेख, उप वनसंरक्षक, यावल(प्रादेशिक), जळगाव यांनी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button