कंटेनर हॉटेलात घुसल्याने घडली घटना ; मृतांचा एकदा वाढण्याची शक्यता
धुळे ;- भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने 12 जण ठार झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ घडली आहे. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने ही अपघाताची घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. यानंतर अग्नीशमन दल आणि पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरुन बांधकाम साहित्य घेऊन जाणारा भरधाव कंटेनर चालला होता. धुळ्यातील पळासनेरजवळ ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला आणि रस्त्यावर उभ्या वाहनांना उडवत हॉटेलमध्ये घुसला. अचानक घडलेल्या या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक लोक मदतीला धावून आले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. सर्व मतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.