गुन्हेदेश-विदेश

राज्यात महिला पोलीस ठरल्या वरिष्ठांच्या अत्याचाराच्या बळी?, व्हायरल पत्र फेक असल्याचा दावा

खान्देश टाइम्स न्यूज | ८ जानेवारी २०२४ | एकीकडे महिला व तरुणी असुरक्षित असल्याचे वारंवार सिद्ध झाले असून राज्यच नव्हे तर देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची वाढत जाणारी संख्या हि एक चिंताजनक बाब ठरली आहे. मात्र एकीकडे सर्वसामान्य व्यक्ती पोलिसांकडून सुरक्षेची अपेक्षा करीत असताना याच पोलीस दलातील महिला पोलीस असुरक्षित असल्याची धक्कादायक चर्चा सध्या सुरू आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठांकडून अत्याचार झाला असल्याची तक्रार करणारे एक पत्र सध्या माध्यमात व्हायरल होत आहे. दरम्यान, हे पत्र फेक आणि कुणीतरी खोडसाळपणे व्हायरल केले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

व्हायरल पत्रात म्हटल्यानुसार, मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा येथील ट्रान्सफर विभागात कार्यरत असलेल्या आठ महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलेले आहे. या पत्राद्वारे या महिलांनी एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक तसेच आणखी एका पोलिस अधिकाऱ्यावर आरोप केलेले आहेत. या म्हटले आहे कि, तुमचे काम कमी करून देतो असे सांगून घरी बोलावून त्या महिला पोलसांचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. महिला पोलिसांना धाक दाखवून अथवा त्यांना इतर आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधून हे प्रकार केले गेले असल्याचे यावरून उघड झालेले आहे.

संशयित ४ पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्यावर अत्याचार केले असून, मानसिकतेसह शारीरिक छळ केला असल्याचे व्हायरल पत्रात म्हटले आहे. या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याबाबत पत्र दिले असल्याचे त्यात नमूद आहे. दरम्यान, आता या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याची व संबंधित अधिकाऱ्यांना ठोक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

ते पत्र बनावट?
या प्रकरणी अपडेट आली असून, या प्रकरणी पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आले असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशीला सुरुवात केली असता, या महिला पोलीस शिपायांच्या नावाचा गैरवापर करून हे बनावट पत्र पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, हे खरे असल्यास ते पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्यामागे नेमका उद्देश काय याची चौकशी सूरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले जात आहे. दरम्यान, जे पत्र माध्यमांमध्ये आलं आहे, ते पत्र बनावट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, जी घटना माध्यमांमध्ये आली आहे, ती चुकीची आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पहा काय म्हणाले पोलीस :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button