खान्देशजळगांवसामाजिक

कोळी क्रिकेट लीग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ ; पहिल्या सामन्यात आरुश्री हॉस्पिटल संघ विजयी

जळगांव- कोळी क्रिकेट लीग पर्व चौथे शिवतीर्थ मैदानावर सुरुवात झाली. या स्पर्धा ८जानेवारी ते ११ जानेवारी पर्यंत घेण्यात येत असून यात एकूण १४ संघ सहभागी झाले आहेत. सामन्यांची सुरवात महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली .पहिल्या दिवशी चार संघामध्ये जोरदार सामना झाला. प्रत्येक संघाने चमकदार अशी कामगिरी केली. त्यामुळे पहिला दिवस हा लक्षवेधी ठरला. पहिला सामना आरुश्री हॉस्पिटल विरुद्ध मोरया यांच्यात झाला. यात आरुश्री हॉस्पिटल ११ धावांनी विजय मिळवला. निलेश सपकाळे यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शरद तायडे,डॉ.परिक्षीत बाविस्कर,तनुज सैंदाणे,पवन रवींद्र सपकाळे,पवन कोळी,शुभम सोनवणे,निलेश सपकाळे,सामाजिक कार्यकर्ते राहूल ठाकरे,राहुल सपकाळे,भिका कोळी,जयदीप सोनवणे,सनी बाविस्कर, सतीश बाविस्कर,पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.
कोळी क्रिकेट लीगला डॉ.शांताराम सोनवणे ,माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,आमदार सुरेश भोळे,नगरसेवक कैलास सोनवणे,कोळी महासंघ अध्यक्ष रमेश पाटील,माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, नगरसेवक मुकुंदा सोनवणे,माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे,श्यामकांत सोनवणे,मुकेश बाविस्कर,सामाजिक कार्यकर्ते विनोद तायडे,गणेश सोनवणे,सागर सोनवणे आदींनी शुभेच्छा दिल्यात.

दुसऱ्या सामन्यांत साईनाथ इंडस्ट्रीजने प्रथम फलंदाजी करत ७५ धावा केल्यात प्रतिउत्तर ९११३ किंग्ज यांनी ७२ धावा करत सामन्यात चुरस वाढविली मात्र २ धावांनी साईनाथ इंडस्ट्रीजने विजय मिळविला. अविनाश कोळी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अश्विन शंकपाल,स्वप्निल सूर्यवंशी,युवराज सोनवणे,ऋषी सोनवणे,वरूण बाविस्कर,विजय सोनवणे, सागर सपकाळे आणि कोळी समाज बांधव आदींनी सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button