जळगाव ;- जळगाव शहरासह भुसावळ आणि सावदा येथे बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात येऊन पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती अशी कि, ११ रोजी हृतिक उर्फ गोलू पूर्ण खिची वय २२ रा. पतंग गल्ली जोशी पेठ हा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करताना आढळून ला . त्याच्याकडून ५ हजार ४०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख यांनी फिर्याद दिल्यावरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भुसावळ शहरातील आदर्श शाळेजवळ सिंधी कॉलनी येथे ११ रोजी करण दिलीप कुमार लुल्ला वय २२ हा नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला . त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सावदा शहरातील तांबटकर गल्लीत मनीषा माहेश्री या नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आल्या. त्यांच्या विरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.