खान्देशगुन्हेजळगांव

शिवाजीनगर उड्डाणपुलाखालून १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाखालून १३ वर्षीय मुलीला एका २२ वर्षीय तरुणाने पळवून नेल्याची फिर्याद दिल्यावरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, खांडवा जिल्ह्यातील बांगडी व्यावसायिक महिलेची १३ वर्षी मुलगीला ९ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आरोपी समीर उमेश चव्हाण वय २२ रा. गुठानिया ता. राँटगाव हरदा मध्यप्रदेश याने बांगडी व्यवसायासाठी जात असल्याचे सांगून तिला शिवाजीनगर उड्डाणपुलाखालून घेऊन गेला. मात्र मुलगी परत न आल्याने व तिचा शोध घेऊनही ती न आढळल्याने मुलीच्या आईने शहर पोलीस स्टेशन गाठून संशयित समीर चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button