जळगाव – नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले.यात पाच जण जिल्ह्याबाहेर तर तीन जणांची अकार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.दरम्यान पोलीस अधीक्षक. एम राजकुमार यांनी 22सहाय्यक पोलीस निरीक्षक व 16पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 38 जणांच्या बदल्यांचे आदेश शनिवारी काढले.
जिल्हा बाहेरून 4 पोलीस निरीक्षक येणार आहे.नाशिक परिक्षेत्रातील २८ निरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये डीवायएसपी होमचा चार्ज असलेले रामकृष्ण महादू कुंभार यांना अहमदनगर, अरुण काशिनाथ धनवडे व राहुल सोमनाथ खताळ व राजेंद्र प्रल्हाद पाटील या तिघांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. तर कांतिलाल काशीनाथ पाटील यांची धुळे जिल्ह्यात बदली झाली आहे.
रामानंदनगरच्या निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे या दोघं प्रभारी अधिकाऱ्यांसह ज्ञानेश्वर जाधव या तिघांचा समावेश आहे.
बाहेरच्या जिल्ह्यातून चार अधिकारी जिल्ह्यात येत आहेत. यात नगरहून मधुकर धोंडिबा साळवे, नाशिक ग्रामीणमधून संदीप पोपट रणदिवे, विकास सुखदेव देवरे, सुनील रामराव पाटील या चौघांचा समावेश आहे.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक जयपाल हिरे यांची आर्थिक गुन्हा शाखेत प्रभारी अधिकारी , शहर पोलिस स्टेशनचे एपीआय किशोर पवार यांची भुसावळ शहर पोलिस ठाण्यात, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल मोरे यांची स्थानिक गुन्हा शाखेत, शहरचे एपीआय रवींद्र बागुल अमळनेर तर जिल्हा पेठचे एपीआय किरण दांडगे यांची टीएमसी विभागात बदली करण्यात आली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पीएसआय प्रिया दातीर यांची नशिराबाद, एमआयडीसीचे रवींद्र गिरासे नियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्षचे राहुल तायडे यांची डीएसबी शाखा, चि तालुका पोलिस स्टेशनचे नयन पाटील यांची सावदा, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे दीपक जगदाळे यांची निंभोरा तर पाचोरा पोलिस ठाण्याच्या विजया वसावे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.