जळगाव ;- दोन विधिसंघर्ष बालकांनी अश्लिल हावभाव करत हात पकडत एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरातील एमआयडीसी परिसरात शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विधी संघर्ष बालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुप्रीम कॉलनी भागात एक २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसोबत राहायला असून शनिवार १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ही घरी एकटी असताना त्याच भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी महिलेकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच एकाने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून दोन मुलांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.