खान्देशगुन्हेजळगांव

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव : शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अमित पिडीयार (वय ३३) आणि राहुल ओमप्रकाश डाबी (वय २९, दोघे रा. रचना कॉलनी) यांच्यावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून आठ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.

ही कारवाई बेंडाळे पेट्रोल पंपाच्यामागे रिक्षा थांब्याजवळ शनिवार, १३ जानेवारी रोजी करण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शनिवार दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्या वेळी तेथे अमित पिडीयार व राहुल डाबी हे नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून आठ हजार रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा हस्तगत केला. पोउनि चंद्रकांत धनगे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश गवळी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button