यावल ;- लग्नाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वयोवृद्ध बापाला कुर्हाडीचे घाव घालून ठार केल्याची घटना तालुक्यातील पिळोदा येथे घडली . याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. रतन तानसिंग कोळी वय-७३ रा. पिळोदा ता. यावल असे मयत वृद्धाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी कि,
यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी हे पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत राहायला होते. रविवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घरी झोपलेले असतांना मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून देत नाही, किंवा लग्नासाठी पैसे देत नाही असे वडील रतन कोळी यांना सांगून वाद घातला. याकडे वडील रतन कोळी यांनी दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्याने रंगाच्या भरात घरात असलेली लोखंडी कुऱ्हाडीने झोपलेले असतांना वडील रतन कोळी यांच्यावर वार करून खून केला. ही घटना घडल्यानंतर पिळोदा गावात खळबळ उडाली आहे.
. यावेळी पतीचा खुन केल्याचे पाहून शुबाबाई यांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.