जळगावात होणार शरद पवारांची भव्य सभा, १० जुलैला जिल्ह्यात येणार
खान्देश टाइम्स न्यूज | ४ जुलै २०२३ | राज्यातील घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यव्यापी दौर्यावर निघाले आहेत. दि.१० जुलै रोजी पवार जळगाव जिल्ह्यात येणार असून जळगाव किंवा मुक्ताईनगर येथे सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी आपण राज्यभरात दौरे करून पक्षाशी बेईमानी करणार्यांच्या विरोधात हल्लाबोल करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर त्यांनी काल माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीवर जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौर्याचा प्रारंभ करणार असल्याचे सूतोवाच केले.
दरम्यान, शरद पवार हे जळगाव १० जुलै रोजी ते जिल्हा दौर्यावर येणार असून याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. शरद पवार यांचा दौरा निश्चीत असून दौर्यात एका ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. जळगाव किंवा मुक्ताईनगर यापैकी एका ठिकाणी शरद पवार यांची सभा होण्याची शक्यता आहे.
आमदार खडसे आणि जिल्ह्यातील मान्यवर नेते उद्या अर्थात ५ जुलै रोजी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याच भेटीत त्यांच्या आगामी दौर्याबाबत निश्चीती होणार आहे. मात्र त्यांचा जळगाव दौरा निश्चीत झाल्याचे मानले जात आहे. याच दौर्यात ते जळगाव जिल्ह्यात पक्षासाठी रणशिंग फुंकणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.