खान्देशगुन्हेजळगांव

मंडळाधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूचे डंपर घालून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणारे दोघे जेरबंद

जळगाव ;- वरणगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱयांवर कारवाईसाठी गेलेल्या मंडलाधिकारी आणि पथकावर वाळूचे डंपर नेऊन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जनाला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे, वय २३, रा.नांद्रा खुर्द ता.जळगाव व डंपर मालक सुभाष पंडीत कोळी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , वरणगावच्या मंडळाधिकारी रजनी शंकर तायडे,हे त्यांच पथकासह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक काढले होते. हे पथक कारवाई करणेकरीता रोडवर असतांना एक भरधाव वाहनाला थांबविण्याचा इशारा केल्यानंतरही ते न थांबता पथकाचे अंगावर भरधाव घेवून आल्याने त्याचेविरुध्द वरणगाव पो.स्टे. भादवि कलम ३०७, ३५३,२७९,३७९,४२७, मो.वा.का. कलम १८४,१७७ गौण खनिज ४८ (७)४८(८) प्रमाणे१२ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. डंपर आरोपी हा त्याचे वाहन सोडून पळून गेला होता तेव्हा पासून तो फरार झाला असल्याने पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षकअशोक नखाते, यांनीत्या आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, यांना आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी स.पो.निरी. निलेश राजपुत, पोह संदिप सावळे, पोह किरण धनगर पोह नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोकों मोतीलाल चौधरी, पो.कॉ. ईश्वर पाटील सर्व नेम.स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, डंपर क्रमांक MH१९८४६७९ चे चालक व मालक हे नांद्रा येथे असल्याबाबत माहिती मिळून आल्याने याची खात्री करून डंपर क्रमांक MH१९८४६७९ चा चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे, वय २३, रा.नांद्रा खुर्द ता.जळगाव व डंपर मालक सुभाष पंडीत कोळी या दोघांना ताब्यात घेवून दोघांना वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button