खान्देश टाइम्स न्यूज | १८ जानेवारी २०२४ | जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी मुंबई येथे पालघर बंदोबस्तासाठी जात असताना मोखाडा घाटात पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मुंबई येथे बंदोबस्त कामी जात होते. पोलीस वाहन क्रमांक एमएच.१९.सीयु.५०९३ ने जात असताना मोखाडा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून दोघांना नाशिक येथे हलविण्यात येत आहे.
पोलीस वाहनात सहाय्यक उपनिरीक्षक उल्हास राणे, हेकॉ. शेखर पाटील, हेकॉ. अमोल देशमुख, हेकॉ. प्रमोद कांडारे, हेकॉ. महेंद्र भटीत, हेकॉ. संदीप ठाकरे, हेकॉ. बाळू पाटील, पोना. करुणासागर जाधव, पोकॉ. हेमंत साळुंखे, पोकॉ. जितेंद्र पांडव, पोकॉ. संतोष बोरसे, पोकॉ. अनिल पाटील, रवी पाटील हे कर्मचारी होते.