जळगाव : शिविगाळ केल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद होवून एकाने येसाजी हेमराज चव्हाण (वय ३६, रा. बालाजी पेठ मारवाडी व्यायाम शाळेजवळ) याच्यावर चॉपरने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येसाजी चव्हाण हा तरुण वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्रीच्या समारास तो त्याचा मित्र रोहन करकरे याच्यासोबत गोंविदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत होता. त्याचवेळी भगवान सोनवणे हा दोन मुलांसोबत दुचाकीवरुन तेथेयेऊन त्यांनी जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी येसाजी याने भगवान सोनवणे याला फोन करुन शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने येसाजी याला फोनवरुन पुन्हा शिवीगाळ केली. त्यानंतर भगवान सोनवणे हा उभा असलेल्या ठिकाणी गेला असता, त्यांच्यात वाद होवून धक्काबुक्की झाली. यावेळी भगवान सोनवणे याने त्याच्या कमरेला खोचलेला चॉपरने येसाजी याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर ते तिघे तेथून पसार झाले.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या येसाजी वाला त्याचा मित्र रोहन कुरकुरे आणि त्याचा भाऊ तानाजी यांनी लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती ठिक आहे. याप्रकरणी येसाजी चव्हाण वाच्या तक्रारीवरुन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीच्या पथकासह शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीच्या सुमारास फरार भगवान सोनवणे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.