जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवारी दुपारी त्यांना ऑनलाईन पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकालेंची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले गुन्हा दाखल झाल्यानंतर सोळा महिन्यानंतर दि. १५ जानेवारी रोजी पोलिसांसमोर शरण आले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बकालेला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने न्यायालयासमोर हजर केले. त्या वेळी त्याला मुख्य न्याय दंडाधिकारी मुगळीकर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केली धुळे रवानगी निलंबित किरणकुमार बकालेला अटक झाल्यानंतर न्यायालय परिसर व न्यायाधीशांच्या निवासस्थानी झालेली गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी बकालेला ऑनलाईन पद्धधतीने न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यानंतर सर्व प्रक्रिया होऊन दुपारी तीन वाजेच्या सुमारास बकालेला जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या कोठडीतून जळगाव कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर तेथे कारागृह प्रशासनाने बकाले यांची धुळे कारागृहात रवानगी केली.