जळगाव l २० जानेवारी २०२४ l कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक १८ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ नशिराबाद येथे करण्यात आले.या शिबिराचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार हे होते.शिबिराचे उद्घाटन भारताचे स्वातंत्र्य सेनानी श्री लालसिंग पवार यांचे पुत्र श्री.रतनलालसिंग पवार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी इकरा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.एजाज अहमद मलिक, सदस्य रशिद शेख, तारिख शेख, नशिराबाद येथील समाज सेवक श्री.सैय्यद बरकत अली, माजी सरपंच श्री पंकज महाजन, केंद्र प्रमुख अफशा तरन्मुम खान,जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ चे मुख्याध्यापिका स. मुबारक बेगम, समन्वयक मसूद शेख , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.चांद खान, प्रा.इब्राहिम पिंजारी, उप प्राचार्य डॉ.वकार शेख , डॉ.युसुफ पटेल उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. इरफान शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वकार शेख यांनी केले, कार्यक्रमाची रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.तनवीर खान यांनी विशद केले. या कार्यक्रमात सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज ,महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. कहकशा अंजुम यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदींची उपस्थिती होती.