खान्देशगुन्हेजळगांव

मोबाईल टॉवरवरील २ लाख ८१ हजाराचे साहित्य चोरले

जळगाव : मोबाईल टॉवरवरील दोन लाख ८१ हजार ३८४ रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना १७ जानेवारी रोजी जळगाव खुर्द शिवारात घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव खुर्द शिवारात खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर असून त्यावर बसविण्यात आलेल्या विविध तांत्रिक साहित्यापैकी दोन लाख ७६ हजार ११६ रुपये किमतीचे एक युनिट, पाच हजार २६८ रुपये किमतीचे ओपीटी असे एकूण दोन लाख ७६ हजार ११६ रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर १८ जानेवारी रोजी तंत्रज्ञ सचिन विश्वनाथ सूर्यवंशी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गिरीश शिंदे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button