खान्देशगुन्हेजळगांव

चोपड्यात ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

चोपडा ;- विक्रेत्याकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, चोपडा शहरातील लोहिया नगरमधील जितेंद्र गोपाल महाजन व सचिन अरुण पाटील यांचे जयहिंद कॉलनी परिसरात गोदाम आहे. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगून सोलापूर विभागात पोलिस कर्मचारी असलेल्या राहुल शिवाजी देवकाते (वय ३५, रा. साकटी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर), विनायक सुरेश चवरे (वय ३५, रा. गोविंदपुरा, गुर्जरवाडा, जि. सोलापूर) व लक्ष्मण ताड (पूर्ण नाव, गाव माहित नाही) हे आले. त्यानंतर या तिघांनी जितेंद्र महाजन व सचिन पाटील यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या वेळी महाजन व पाटील यांना या तिघांबद्दल संशय आल्याने त्यांनी व्यापारी संघटेनेचे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना हा प्रकार भ्रमणध्वनीवरून कळविला, तर अमृतराज सचदेव यांनी तत्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना ही बाब कळवली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांची कुमक घटनास्थळी पोहचली असता या तोतयागिरी करणाऱ्यांचे भांडे फुटले. या प्रकरणी जितेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरुन या तिघांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात कलम १७०, ३८४, ४१९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर लक्ष्मण ताडे हा फरार झाला आहे. होण्यात यशस्वी झाला आहे. या प्रकरणाचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button