जळगाव : – मुंबई येथे कार्यरत असलेल्या पोलीस असलेल्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर महेंद्र ठाकूर (रा. शिरसोली ता. जळगाव) यांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथे ३१ वर्षीय महिला पोलीस नोकरीस असून त्या आई व दोन मुलांसोबत वास्तव्यास आहेत दोन वर्षांपासून प्रियंका यांचा पतीसोबत घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. २१ डिसेंबर रोजी यांच्या मैत्रीणीने तिच्या ओळखीतील महेंद्र ठाकूर याचा मोबाईल क्रमांक देवून तो देखील दुसरा विवाह करीत असून तुम्ही दोघे बोलून घ्या असे सांगितले. दि. ४ जानेवारी रोजी महेंद्र ठाकूर याने प्रियंका यांना फोन करुन मी मुंबईला येत असून माझी मावशी तुम्हाला बघण्यासाठी येणार असल्याचे त्याने सांगितले. महेद्र याने मी आयटी कंपनीत नोकरीस असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार दि. ७ जानेवारी रोजी प्रियंका यांच्या घरी त्यांना पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी आम्हाला मुलगी पसंत असल्याचे सांगितले.
घर दाखविण्यासाठी बोलावून केला . अत्याचार महेंद्र ठाकूर हा त्याचे शिरसोली येथील घर पाहण्यासाठी दि. ८ जानेवारी रोजी प्रियंका या मुलाला घेवून आला होता. यावेळी त्याचे आई वडील बहिणीकडे गेलेले असतांना महेंद्र याने प्रियंका यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यावेळी महिलेने त्याला विरोध केल्यानंतर देखील वेळोवेळी त्याने महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य करुन अत्याचार केले.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.