जळगाव ;-विवाहितेशी वाद घालून मी पण येथेच राहतो म्हणत विवाहितेच्या डोक्यात फरशी मारली, यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी योगेश कौतिक पाटील (रा. पाथरी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजीनगरात भावना योगेश पाटील (वय २८) या विवाहिता राहत असून दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विवाहिता या घरी असतांना योगेश कौतिक पाटील हे महिलेच्या घरी गेले, त्यांनी महिलेला मी पण येथेच राहतो म्हणत वाद घालू लागला. महिलेने त्याला विरोध केला असता, योगेश पाटील याने महिलेचे केस घरून तीला जमिनीवर आपटले. तसेच सोबत आणलेल्या फरशीचा तुकडा महिलेच्या डोक्यात हाणून त्यांना गंभीर जखमी के ले. महिलेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार योगेश कौतिक पाटील रा. पाथरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.