खान्देशगुन्हेजळगांव

मुक्ताईनगरात बंद घर फोडले ; पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगर ;– तालुक्यातील चिखली येथील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी लाकडी दरवाजाचा कडी कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करीत हॉलमधील तिजोरी मधून सुमारे दोन लाख 79 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना 25 नोव्हेंबर ते 21 जानेवारी दरम्यान घडली असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असलेले संजय भैरव सिंग ठाकूर वय 42 हे शेतकरी ते पुणे येथे राहत असून ते 25 नोव्हेंबर 2023 ते २१ जानेवारी २९२४ दरम्यान गेले असता अज्ञात चोरटयांनी त्यांच्या चिखली येथील घरातून अज्ञात चोरटयांनी घराचा कडी कोयंडा तोडून तिजोरीतील 35000 चे सोन्याचे बिस्किट, आठ हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कि,ट 45 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या बिस्कीट, सोन्याच्या 54 हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या, आठ हजार रुपये किमतीचे चांदीचे साखळ्या 2000 किमतीचा कंबरपट्टा ,चांदीचे जोडवे असा एकूण दोन लाख 79 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संजय ठाकूर यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button