
सावदा येथे शहीद अ हमीद यांना पुष्पचक्र वाहूनअभिवादन
मुख्तार शेख
सावदा ;– सावदा शेखपुरा भागात शहिद अ हमीद स्मारक आहे व सालाबादप्रमाणे यंदाही आज 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावदा पोलिस ठाण्याचे ए पी आय जालिंदर पळे हे होते .तसेच प्रमुख अतिथी म्हणून सावदा नगरपरिषद मुख्याधिकारी हर्षल सोनवणे ,तसेच माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, गटनेते फिरोज खान पठाण ,माजी नगराध्यक्षा सौ रेखा ताई वानखेडे ,माजी नगराध्यक्षा सौ नंदा ताई लोखंडे, माजी नगरसेवक अलबक्ष ऊर्फ गुड्डू मेंबर ,माजी नगरसेवक सिध्दार्थ बडगे, राजेश कोल्हे, सिमरन वानखेडे हुसैन खान बाबु, लाल दादा तसेच ,शहिद अ हमीद सोसायटी अध्यक्ष मुख्तार शेख, सचिव फिरोज खान आणि अमजद खान आणि शेखपुरा भागातील नागरिक उपस्थित होते.





