खान्देशगुन्हेजळगांव

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेचे सव्वा लाखांचे दागिने लुटले

जळगाव :- दोन अज्ञात भामट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करण्याचा बहाणा करून 65 वर्षीय वृध्द महिलेचे एक लाख 25 हजारांचे दागिने हातचलाखीने लांबविल्याचा प्रकार शहरातील ईश्वर कॉलनीत उघडकीस आला. याप्रकरणी बुधवार, 5 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, ईश्वर कॉलनी परीसरात मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (65) या देरानी बायादेवी उदयराज वर्मा यांच्यासोबत राहतात. आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन्ही वृध्द महिला घरी असतांना दोन अज्ञात भामट्यांनी कंपनीचे सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो म्हणून त्यांनी विश्वास संपादन करीत तांब्या दिल्यानंतर त्याला चकाकून दिल्यानंतर संशयितांनी दागिने देखील झळाळून देतो म्हणून सांगितल्याने वृध्द महिलेने सुरूवातील दोन चांदीचे कमरपट्टे दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले त्यामुळे वृध्द महिलेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याच्या कानातील रींगा काढून दिल्या. दोघांनी एका पातेल्यात हळद व लालसर रंगाची पावडर टाकून दागिने गॅसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर थंड झाल्यावर काढून घ्या, असे सांगून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हातचालाखीने चोरून पोबारा केला. . फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिल्यावरून गुणही दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button