मुंबई ;- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं. तसंच, थोड्याचवेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते उपोषण सोडणार आहेत.
“मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आपला लढा होता. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.