जळगाव, ;- जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि 26 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले.
रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या शहरातच उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने या लॅबची शहरात उभारणी करण्यात आल्याचे तन्वीर पटेल यांनी सांगितले. आधी अनेक वेळा रुग्णांचे नमुने मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरात पाठवावे लागायचे त्यामुळे रिपोर्टसाठी रुग्णांना व नातेवाईकांना दोन तीन दिवस वाट पाहत बसावी लागायची, मात्र आता अवघ्या दोन तासात सर्व रिपोर्ट मिळणे शक्य होईल, ज्यामुळे रुग्णांना आपल्या आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी वेळ लागणार नाही.
अशोक जैन यांनी फित कापून केले उद्घाटन…
लुपिन डायग्नोस्टिक्स या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लॅबच्या उद्घाटना प्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी हे देखील उपस्थित होते.
अशोक जैन यांनी लॅबच्या कार्याबाबत व तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती जाणून घेतली त्यांना मयूर सूर्यवंशी यांनी संपूर्ण कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. दरम्यान अशोक जैन यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या प्रयत्नांमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच गती मिळेल, आणि अनेकांना त्याचा लाभ होईल. रुग्णांचा व डॉक्टरांचा यामुळे मौल्यवान वेळ वाचेल. आणि अनेकांना योग्यवेळी योग्य तो उपचार मिळेल.
यावेळी लुपिन डायग्नोस्टिक्स चे सेल्स मॅनेजर योगेश परजणे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले, तर एरिया सेल्स मॅनेजर सागर शेलार यांनी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांचे स्वागत केले.
उद्घाटना वेळी लुपिन डायग्नोस्टिक्स च्या डॉ. रेणुका इथापे, योगेश परजणे, सागर शेलार, तन्वीर पटेल, विजय बोरणारे, केतन सोनवणे, प्रेम सोनार आदी. उपस्थित होते.