जळगांव

जिल्ह्यात पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, एमआयडीसीला आव्हाड तर अमळनेरला देवरे

खान्देश टाइम्स न्यूज | २८ जानेवारी २०२४ | आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात नव्याने काही अधिकारी दाखल झाल्याने पुन्हा काही अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय पदस्थापना व बदल्या करण्यात आल्या आहे.

बदली करण्यात आलेल्या आदेशानुसार अहमदनगर येथून पोनि.मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथील पोनि.विकास देवरे यांची अमळनेर पोलीस स्थानक, पोनि.सुनील पाटील भडगाव पोलीस स्थानक, पोनि.संदीप रणदिवे रामानंदनगर पोलीस स्थानक, भुसावळ बाजार पेठचे पोनि.बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस ठाणे, भुसावळ शहर पोलीस स्थानकाचे सपोनि. संतोष चव्हाण यांची अडावद पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.निलेश राजपूत यांची प्रभारी कासोदा पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथून सपोनि. प्रकाश काळे हे प्रभारी पिंपळगाव हरे. पोलीस ठाणे, पिंपळगाव हरे. येथील सपोनि.महेद्र वाघमारे हे एमआयडीसी पोलीस ठाणे, धुळे येथून सपोनि.गणेश फड यांची नियंत्रण कक्षात, अहमदनगर येथून सपोनि.तेजश्री पाचपुते नियंत्रण कक्षात, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.कल्याणी वर्मा यांची जळगाव शहर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथून पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांची निंभोरा पोलीस ठाणे, अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची देखील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button