खान्देशगुन्हेजळगांव

जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांचे खांदेपालट

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदली करुन खांदेपालट करण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. आगामी लोक सभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिह्यात पोलीस विभागात काही अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय पदस्थापना व बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यासह परिक्षेत्रातून बदलून आलेल्या १५ पोलीस निरीक्षकांसह, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहेत. यामध्ये अहमदनगर येथून बदलून आलेले पोनि. मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर पोलीस स्थानकाला तर नाशिक ग्रामीण येथील पोनि. विकास देवरे अमळनेर पोलीस स्थानकाला, पोनि. सुनील पाटील भडगाव पोलीस स्थानकाला, पोनि. संदीप रणदिवे यांची रामानंदनगर पोलीस स्थानकाला, भुसावळ बाजार पेठचे पोनि. बबन आव्हाड यांची प्रभारी एमआयडीसी पोलीस स्थानकाला तर भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोनि. गजानन पडघन यांची बाजारपेठ पोलीस स्थानक भुसावळ येथे बदली करण्यात आली आहे.
यामध्ये पोनि पडघन यांनी त्यांच्याकडील कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात दुय्यम अधिकाऱ्याकडे सोपवून तात्काळ हजर होण्याचे आदेश पोलीसअधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.नाशिक ग्रामीण येथून सपोनि. प्रकाश काळे हे प्रभारी पिंपळगाव हरे. पोलीस स्थानकाला, पिंपळगाव हरे. येथील सपोनि. महेद्र वाघमारे यांची एमआयडीसी पोलीस स्थानकाला, धुळे येथून सपोनि. गणेश फड यांची नियंत्रण कक्षात, अहमदनगर येथून सपोनि. तेजश्री पाचपुते नियंत्रण कक्षात, नाशिक ग्रामीण येथून सपोनि. कल्याणी वर्मा यांची जळगाव शहर पोलीस स्थानकाला,नाशिक ग्रामीण येथून पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांची निंभोरा पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.

अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या नावाने तेथील कर्मचाऱ्याने बांधकाम व्यावसायीकाचे डंपर अडवून लाच मागितल्याची घटना घडली होती. याप्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस दलाकडून चौकशी सुरु होती. या प्रकरणातून अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांपूर्वीच पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. या पाठोपाठ राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांचेदेखील आदेश काढण्यात आले. यात दत्तात्रय निकम हे मुंबई लोहमार्ग व प्रदीप ठाकूर हे अमरावती ग्रामीण येथून जळगावला बदली होवून येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button